Affiliated to Savitribai Phule Pune University, Pune  |    Best College Award by Savitribai Phule Pune University(2004-05)   |    Rayat Mauli Purskar 2005-06   |    DST-FIST Sponsored College   |    NAAC ACCREDITED WITH 'A' GRADE (3.07 CGPA) (2017-18)  |    ISO 9001:2015 Certified (2018-19)   

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील फोटो


           आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या मोजक्या महामानवांचे योगदान आहे, त्यापैकीच शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे एक होते होत. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. ग्रामीण भागात व बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही हे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जाणले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून एक शैक्षणिक चळवळ उभी केली. वसतिगृहयुक्त शिक्षणास श्रमाची जोड दिली, 'कमवा व शिका योजने' च्या माध्यमातून, आणि 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' अशी उद्घोषणा करून शिक्षण प्रक्रिया अधिक सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी अशा स्वरूपाचे शिक्षण देऊन श्रमाला व सामाजिक समानतेला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.

           व्हालंटरी शाळांपासून सुरु झालेला या संस्थेचा प्रवास आज महाराष्ट्राच्या १४ व कर्नाटक राज्यातील एक अशा १५ जिल्यात विस्तारला असून पूर्वप्राथमिक ते महाविद्यालये, वसतिगृहे, आश्रम शाळा व इतर शाखा अशा एकूण ७३७ शाखा कार्यरत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी व नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेकडे आदराने पहिले जाते. बहुजन समाजाच्या व महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे मोठे योगदान आहे. संस्थेच्या माधमातून आण्णांनी जे उत्तुंग असे शैक्षणिक काम कार्य केले ते पाहून रयतेने त्यांना 'कर्मवीर' हि सर्वश्रेष्ठ पदवी दिली. भारत सरकारने २६ जानेवारी १९५९ रोजी 'पद्मभूषण' हा पुरस्कार देवून आण्णांचा सन्मान केला, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ५ एप्रिल १९५९ रोजी डी. लीट. हि पदवी देवून आण्णांचा गौरव केला. वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह असून आजही वटवृक्षाप्रमाणे मातीशी आपले नाते सांगत मुळे घट्ट रोवून विज्ञान युगात आकाशाकडे झेपावत ती शैक्षणिक प्रगती साधत आहे.

          

KARMAVEER BHAURAO PATIL BIOGRAPHY ( रयत काल आज आणि उद्या - Sanstha Documentry)

Dada Patil Mavidyalaya Karjat Dada Patil Mavidyalaya Karjat DP College Karjat dpcollege Karjat Website designed and developed by Ravindra Salunke Ravindra Salunke, Mirajgaon Ravindra Balasaheb Salunke, Mirajgaon Ravindra Salunke