आज महाविद्यालयात इयत्त अकरावी ते पीएच.डी. च्या संशोधन केंद्रापर्यंत उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या विविध प्रशाखा सु डिग्री असून, त्यात कला, वाणिज्य, किमान कौशल्य, विज्ञान, बी.बी.ए. (सी.ए.), बी.सी.एस., बी. व्होक अश विविध विद्याशाखांचा समावेश आहे. तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांचे पदव्युत्तर शिक्षण देण्याची सुविधाही उपलब्ध झाली असून, शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून हिंदी, भौतिकशास्त्र व वनस्पतिशास्त्र या विषयांची पीएच.डी. संशोधन केंद्रे सु डिग्री होत आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ‘आंतर विद्याशाखीय शिक्षण’, ‘मूल्यशिक्षण’ व ‘कौशल्यधिष्ठित शिक्षण’ ही सूत्रे समोर ठेवली आहेत. आणि काळाची पाऊले ओळखून महाविद्यालयाने कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम असलेले 38 शॉर्ट टर्म कोर्सेस सु डिग्री करून प्रत्येक विद्यार्थ्याने पदवी घेऊन बाहेर पडताना एक तरी कौशल्य आत्मसात केले पाहिजे, हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कीर्तन महोत्सव, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, बहि:शाल शिक्षण, विशेष मार्गदर्शन वर्ग यासारख्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी हा स्पर्धेच्या युगात सक्षम व्हावा म्हणून विविध उपक्रमांचे उपयोजन महाविद्यालयात केले जात आहे.
महविद्यालयाचा क्रीडा विभाग व राष्ट्रीय छात्रसेना (एन.सी.सी.) व संस्थेच्या पथदर्शी असा ‘रयत मिल्ट्री अकादमी’ हे विभाग केवळ संस्थेतच नव्हे तर महाराष्ट्रात स्वत:च वेगळी नाममुद्रा उमटविणारे ठरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील संशोधनाच्या विविध क्षमता असतात, फक्त त्यास योग्य मार्गदर्शन व दिशा दाखविण्याची आवश्यकता असते. त्यासाठी महाविद्यालयात ‘आयडियाचा आविष्कार’ हा उपक्रम व ‘पेटेंट सेल’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा आविष्कार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचे फलित म्हणजे आज महाविद्यालयात चार प्राध्यापकांनी मिळविलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटेंट, ‘होम सॅनेटरी पॅड’ या प्रकल्पासाठी पाच विद्यार्थ्यांना मिळालेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नामांकन, 14 पीएच.डी. मार्गदर्शकांची वाढलेली संख्या व तीन विषयांची संशोधन केंद्रे होत.
‘पर्यावरणयुक्त परिसर’ हा महाविद्यालयाचा विशेष ठेवा असून, महाविद्यालय परिसर, निसर्ग सुंदर व स्वच्छ ठेवणे, परिसरातील कचयाची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळखत प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट, एनव्हारमेंटल ऑडिट करून महाविद्यालयास आय.एस.ओ. नामांकनही प्राप्त झाले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना’ यशस्वीपणे राबविली जात असून, कनिष्ठ विभागाला या योजनेचा लाभ करून देण्याच्या हेतूने महाविद्यालयाने ही योजना स्वतंत्रपणे राबविण्यास प्रारंभ केलेला आहे. गेल्या 7 वर्षात या योजनेचा लाभ 412 विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
महाविद्यालयातील विविध विभागांनी महाराष्ट्रभरातील विविध संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, कंपन्या यांच्याशी सामंजस्य करार केलेले असून एकूण 32 सामंजस्य कराराच्या माध्यमातून ज्ञानाचे आदान-प्रदान, कॅम्पस् इंटरव्ह्यू, संशोधन व अभ्यास सहली, विस्तार कार्य याद्वारे विद्यार्थ्यांना बहुमुखी केले जात आहे.महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर सी.सी.टी.व्ही. अंतर्गत प्रभावित असून, सुरक्षितता, शांतता व शिस्त यांच्या त्रिवेणी संगमामुळे गेल्या 5 वर्षांपासून विद्यार्थीनींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘स्त्रीसबलीकरण’ उपक्रमातून मुलींना स्वसंरक्षण व स्वावलंबनाचे धडे दिले जात आहेत.
स्पर्धेच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी महाविद्यालयाने सु डिग्री केलेले शॉर्ट टर्म कोर्सेस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विविध विभागांचे होणारे रोजगार मेळावे, कॅम्पस् इंटरव्ह्यू या माध्यमातून आज 729 विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहिले असून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 61 विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकार पदावर देखील पोहोचले आहेत.
गुणात्मक विकासाबरोबरच रचनात्मक विकास साधताना आज महाविद्यालयातील सर्व विभागांना पायाभूत व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देताना प्रशासकीय इमारत, कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान स्वतंत्र इमारती, सुसज्य प्रयोगशाळा, समृध्द ग्रंथालय, दोन भव्य इनडोअर स्टोडिअम, वसतिगृह सुविधा आणि संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 5 करोड 27 लाख रूपयांच्या मदतीतून उभे राहत असलेले ‘शारदाबाई पवार सभागृह’ अशा समृध्दतेने महाविद्यालय परिसर सुसज्ज झालेला आहे. नजिकच्या काळात ‘आय.टी. पार्क बिल्डिंग’, ‘स्कील इनव्हान्समेंट बिल्डिंग’ व ‘ह्युमॅनिटी सायन्सेस बिल्डिंग’ उभ्या करण्याचा मानस आहे. सध्या पाच मजली सायन्स बिल्डिंगचे काम प्रगतीपथावर असून लिफ्टयुक्त जिल्ह्यातील पहिली महाविद्यालय इमारत म्हणून ही इमारत ओळखली जाईल. महाविद्यालयाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार, चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन अॅड्. भगिरथ शिंदे, मॅनेजिंक कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. राजेंद्रजी फाळके, जनरल बॉडी सदस्य व कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. रोहितदादा पवार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. अंबादासजी पिसाळ, मा. बप्पाजी धांडे, मा. राजेंद्र निबांळकर या सर्वांचे व मार्गदर्शन व सर्व सहकारी रयत सेवकांचे सहकार्य यामुळे महाविद्यालयाने आज गुणात्मक व रचनात्मक विकासात भरारी घेतली आहे.
धन्यवाद ! जयहिंद ! जय कर्मवीर !!
With regards,
Principal, Dr.Sanjay Nagarkar
Dada PatilMahavidyalaya,
Karjat Dist. Ahmednagar